Home Top News आंदोलनकर्त्यांची सावली प्रशासनाने  हिरावून घेतली

आंदोलनकर्त्यांची सावली प्रशासनाने  हिरावून घेतली

0
72
जिल्हाधिकारी कार्यालयसमोरील झाड तोडले
वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे कारण देत झाडाचा घेतला बळी

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील एक झाड आज तोडण्यात आले. विशेष म्हणजे हे झाड तोडण्याचे कारण न पटणारे देण्यात आले आहे. हे झाड वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्याचे मत प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आले आहे. मुळात हे झाड कोणत्याच वाहनांना अडथळा करत नव्हते तरीही हे झाड प्रशासनाने आज तोडले. खरच प्रशासनाला शहरातील वाहतुक कोंडीची एवढी काळजी असेल तर जे बँनर वाहतुकीस अडथळा करत आहेत ते बँनर का काढले जात नाही हा प्रश्‍न याठिकाणी उपस्थित होत आहे.

अनेक समस्यांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरीक लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलने करत असतात. परंतु आता त्यांना याठिकाणी पुर्वी सारखी सावली मिळणार नाही. कारण याठिकाणी असणारे मोठे झाड प्रशासनाच्या वतिने आज तोडण्यात आले आहे. एकीकडे  जिल्ह्यात झाडांची संख्या कमी आहे तर दुसरीकडे जी झाडे आहेत ती झाडे तोडण्याचे काम येथील प्रशासन करत आहे. आज तोडण्यात आलेल्या झाडांचे कारण न पटणारे देण्यात आले आहे. प्रशासनाने काढलेल्या पत्रात या झाडामुळे वाहतुकीस अडथळा येत असल्याचा उल्लेख केला आहे. परंतु आज पर्यंत ह्या झाडामुळे कधीच वाहतुकी कोंडी झालेली नाही. प्रशासनाने हे झाड तोडल्यामुळे वृक्षप्रेमींनी याचा निषेध नोंदवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here