Home Top News मेहबुब शेख यांचे पद धोक्यात; रोहित पाटील यांची वर्णी लागणार!

मेहबुब शेख यांचे पद धोक्यात; रोहित पाटील यांची वर्णी लागणार!

0
69
प्रारंभ वृत्तसेवा

बीड : माजी गृहमंत्री स्व.आर.आर.पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना राज्याचे युवक प्रदेशाध्यपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे.  आमदार रोहित पवार यांनी सुद्धा त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. सध्याचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख हे मागच्या काळात वादात सापडल्यामुळे त्यांना दुसरी जबाबदारी देण्यात येणार असल्याची सुद्धा चर्चा आहे.

रोहित पाटील यांनी कमीत वयात सर्वसामान्यांशी वाढवलेला संपर्क व कवठे महांकाळ नगर पंचायत मध्ये मिळवलेले यश हे पाहूण त्यांना अजून वेगळे काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यांना युवक प्रदेशाध्यपद देण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून त्यांना लवकरच युवक प्रदेशाध्यपद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तर सध्याचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख मध्यंतरी वादात सापडल्यामुळे त्यांच्याकडून हे पद काढूण घेत त्यांना दुसरी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here