Home Top News आज सुद्धा जिल्ह्यात कोरोनाचा चढताक्रम

आज सुद्धा जिल्ह्यात कोरोनाचा चढताक्रम

0
67

बीड तालुक्यात जास्त रुग्ण

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : परत कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात वाढत असून शनिवारच्या तुलनेत जिल्ह्यात रविवारी सुद्धा जास्त रुग्ण आढळले आहेत. रविवारी आलेल्या आकडेवारीत एकूण 32 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यात बीड तालुक्यात 16 नव्या रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात आकडे परत वाढू लागल्याने चिंतेत भर पडत आहे.

आज दुपारी आरोग्य विभागाकडून 1410 रिपोर्टचे अहवाल प्राप्त झाले यात 1378 रिपोर्ट निगेटिव्ह आले तर 32 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. बीड 16, अंबाजोगाई 02, गेवराई 02, माजलगाव 01, परळी 04, पाटोदा 01, शिरुर 04, वडवणी 02 असे रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत. जिल्ह्यात परत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्ह्याच्या चिंतेत भर पडत आहे. कोव्हीड नियमांचे पालन करण्याच्या सुचना सुद्धा जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here