Home Top News बीडमध्ये खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिव्यांग बांधवांना मोफत व्हिल चेअर व साहित्यांचे...

बीडमध्ये खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिव्यांग बांधवांना मोफत व्हिल चेअर व साहित्यांचे वाटप

0
73
आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा स्तुत्य उपक्रम; शरद पवार साहेबांचा अभिष्टचिंतन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण, पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
बीड (प्रतिनिधी):- देशाचे माजी कृषी मंत्री पद्मविभुषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने बीडमध्ये आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. दिव्यांग बांधवांना मोफत व्हिल चेअर व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मुंबई येथील अभिष्टचिंतन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात भव्य एलईडी वॉलवरून पहायला मिळाले. यावेळी आ.संदिप भैय्या क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलिम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.उषाताई दराडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड.डी.बी.बागल, रेखाताई क्षीरसागर यांची विशेष उपस्थिती होती. बीड येथील या व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून अनेक मान्यवर मंडळींनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
देशाचे माजी कृषी मंत्री पद्मभुषण खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त रविवार दि.12 डिसेंबर 2021 रोजी बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी 10 वाजल्यापासून नेहरू सेंटर वरळी, मुंबई येथून सुरू असलेल्या पक्षाच्या वर्च्युअल रॅलीचे व पवार साहेबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण भव्य एलईडी वॉलवरून पहायला मिळाले. मुंबई येथील व्यासपीठावर पद्मविभुषण खा.शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह आदी नेते मंडळींची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय नेते प्रफुल्लभाई पटेल, खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी कार्यकर्त्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला. दरम्यान यावेळी खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बीड मतदार संघातील दिव्यांग बांधवांना आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मोफत विविध साहित्याचे व व्हिल चेअरचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून बीड मतदार संघात शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन घेण्यात आले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या थेट प्रक्षेपण सोहळ्यास बीड मतदार संघातील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी अ‍ॅड.प्रज्ञाताई खोसरे, अ‍ॅड.हेमाताई पिंपळे, महिला जिल्हाध्यक्षा संगिताताई तुपसागर, जिल्हा उपाध्यक्ष बबन गवते, वैजीनाथ तांदळे, मदन जाधव, अ‍ॅड.बाळासाहेब कोल्हे, विद्याताई जाधव, सेवादलाचे शेख पाशाभाई, तालुकाध्यक्ष महादेव उबाळे, शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर, नंदु कुटे यांच्यासह वकील, डॉक्टर, पत्रकार बांधव यांची विशेष उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here