Home Top News नारायण गडाच्या नवनिर्वाचित विश्‍वस्तांचा कर्मयोगी निधी अर्बन बँकेच्या वतीने गौरव

नारायण गडाच्या नवनिर्वाचित विश्‍वस्तांचा कर्मयोगी निधी अर्बन बँकेच्या वतीने गौरव

0
72
बीड, प्रतिनिधी : अल्पावधीत ग्राहक, ठेवीदार आणि कर्जदारांच्या विश्‍वासात पात्र ठरलेल्या कर्मयोगी निधी अर्बन बँकेच्या वतीने क्षेत्र नारायण गडाच्या नवनिर्वाचित विश्‍वस्तांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
भाविक- भक्तांची धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या क्षेत्र नारायण गडाच्या विश्‍वस्तपती नुकतीच अनिल जगताप, सीए बी. बी. जाधव,  बळीराम गवते, गोवर्धन काशिद यांची महंत शिवाजी महाराज यांनी निवड केली. राजकारण, समाजकारण, उद्योग, अर्थकारण आणि शिक्षण आदी क्षेत्रात निवड झालेल्या मान्यवरांनी काम केलेले आहे. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी केलेली निवड नवनिर्वाचित विश्‍वस्त सार्थ ठरवतील असे म्हणत कर्मयोगी निधी अर्बन बँकेच्या अध्यक्ष सदर्शन धांडे यांनी सीए बी. बी. जाधव, अनिल जगताप, बळीराम गवते, गोवर्धन काशिद यांचा कर्मयोगी निधी अर्बन बँकेच्या मुख्य कायालयात गौरव केला. यावेळी सेनेचे जेष्ठ नेते विलास महाराज शिंदे, कर्मयोगी बँकेचे अध्यक्ष सुदर्शन धांडे, सुधीर काकडे, सोमनाथ धांडे, नवनाथ प्रभाळे, सचिन कोठूळे, विठ्ठल बहिर, मळीराम यादव, संतोष जाधव, विजय लव्हाळे, विकास सुस्कर, संतोष घीगे, गणेश मस्के, पंकज वेदपाठक, मनोज गोडसे, अनिल देवतरासे यांच्यासह कर्मयोगी परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो- बीड : कर्मयोगी निधी अर्बन बँकच्या क्षेत्र नारायण गडाच्या नवनिर्वाचित विश्‍वस्तांचा सत्कार करताना विलास महाराज शिंदे, बँकेचे अध्यक्ष सुदर्शन धांडे, सोमनाथ धांडे आदी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here