Home Top News श्री क्षेत्र नारायणगड संस्थानच्या नूतन विश्वस्तांचा राजयोग फाउंडेशन च्या वतीने स्नेह सत्कार...

श्री क्षेत्र नारायणगड संस्थानच्या नूतन विश्वस्तांचा राजयोग फाउंडेशन च्या वतीने स्नेह सत्कार संपन्न

0
79

बीड प्रतिनिधी :महाराष्ट्राची धाकटी पंढरी समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायणगड संस्थानच्या विश्वस्तपदी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, पंचायत समिती सभापती बळीराम गवते, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सी.ए.जाधव, गोवर्धन काशिद  यांची काही दिवसांपूर्वीच निवड झाली.

श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व निवड संपन्न झाल्या. यानिमित्त शुक्रवार दि.१२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वा. सारडा कॅपिटल येथे राजयोग फाउंडेशन च्या वतीने या नूतन विश्वस्तांचा स्नेह सत्कार करण्यात आला.
नारायणगडाची उज्वल अध्यात्मिक परंपरा पुढे घेवून जाताना, नारायणगडाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच विश्वस्तांच्या माध्यमातून विशेष कार्य येत्या काळात होईल अशी खात्री आणि विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला.
या नूतन विश्वस्तांचा स्नेह सत्कार करुन शुभेच्छा देतांना पर्यटन विकास महामंडळाचे माजी संचालक दिलीप धुत, नगरसेवक शुभम धुत यांच्यासह व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सोहनी, जवाहरलाल मंत्री, ॲड. जयप्रकाश चरखा, आत्माराम पवार, सुमंत रुईकर, केदार मानधने, धनंजय वाघमारे, आनंद वाघ, शुभम कातांगळे, अभिजीत आव्हाड, सत्यनारायण करवा, अशोक करवा, पवन शर्मा, शिवाजी कोलगुडे, हुसेन शेख, गिरीश मुंदडा, विक्रम चव्हाण, विशाल वाघमारे, संदीप रसाळ, रुद्र चव्हाण, शुभम पोते, सागर वाहुळ, मेघराज जगदाळे, काशिफ चाऊस, शिवम घाडगे, संकेत करवा, राजदिप धुत, कमलाकर पांडव, सय्यद ताहेर, विलास दातखीळ, सुनील घाटे, परमेश्वर क्षीरसागर, नितीन तिपाले व इतर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here