Home Top News लालपरी बंदच; सातव्या दिवशी पण संप सुरुच!

लालपरी बंदच; सातव्या दिवशी पण संप सुरुच!

0
73

बस सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांची होतेय गैरसोय

प्रारंभ । वृत्तसेवा

बीड : ऐन दिवाळीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे दिपावलीसाठी घरी येणाऱ्या प्रवाशांची चांगलीच धांदल उडाली आहे. बसचा संप सुरू असल्यामुळे याचा अनेक खासगी वाहनांकडून गैरफायदा घेत मनमानी भाडे आकारले जात आहेत. यालाच लगाम लावण्यासाठी बीड आरटीओ कार्यालय आता सतर्क झाले असून खासगी वाहनांच्या तपासण्या करत अतिभाडे घेणाऱ्या वाहनचालकांना दंड करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच तक्रारदारांच्या तक्रारी असल्यास त्यांना तक्रारी करण्यात अडचण येवू नये यासाठी बीड, गेवराई, आष्टी, पाटोदा या चार आगारावर संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसुद्धा करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय होवू नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती प्रारंभला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here