Home Top News पवार साहेब तुमचे मंञी ठुमके पाहण्यात व्यस्त तर जनता त्रस्त!

पवार साहेब तुमचे मंञी ठुमके पाहण्यात व्यस्त तर जनता त्रस्त!

0
103
पालकमंत्र्याच्या मतदार संघात रंगला सपना चौधरीचा कार्यक्रम
शेतकरी आत्महत्या करतोय, एसटी कर्मचारी संपावर तरीही पालकमंत्र्यांना वेळ मिळेनाप्रारंभ वृत्तसेवा

बीड : राष्ट्रवादीचे नेते पवार साहेब यांनी नेहमीच सर्वसामन्यांच्या प्रश्‍नांना महत्व दिलेले आहे. पवार कुटूंबाचे दरवाजे जनतेसाठी नेहमीच उघडी असतात. यामुळेच त्यांना सर्वसामान्य नागरीक पसंती देतो. परंतु पवार साहेब तुमचेच नेते बीड जिल्ह्यातील समस्या बाजूला ठेवून ठुमके पाहण्यात व्यस्त दिसत आहेत. एकीकडे येथील जनता विविध समस्यांनी त्रस्त आहे, येथील एसटी कर्मचारी संपावर आहेत, येथील शेतकरी आत्महत्या करत आहेत,  अतिवृष्टीने नुकसान झालेला शेतकरी अजून सुद्धा उभारलेला नाही, येथील बेरोजगार युवक रोजगाराच्या शोधत मोठ्या शहरात जाऊ लागला आहे. यासह इतर समस्या बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या असताना सुद्धा बीडचे पालकमंत्री मात्र परळीत प्रसिद्ध सपना चौधरीचे ठुमके पाहण्यात व्यस्त दिसत आहेत.

पवार साहेब आपण राज्यातील जनतेचे नेहमीच हित पाहीलेले आहे. यामुळेच आज राज्यातील जनता तुमच्यावर एवढे प्रेम करते. कोरोनाचे संकट असताना सुद्धा पाडव्या दिवशी राज्यातुन जनता तुम्हाला भेटायला आली होती. आपण भक्कम उभारलेला पक्ष कमी करण्याचे काम आता आपले नेते करतायेत की काय अशा प्रश्‍न उभा राहत आहे. बीडचे पालकमंत्रेी यांनी चक्क परळीत सपना चौधरी यांचा कार्यक्रम आयोजित केला, त्यात गैरही काही नसेल परंतु ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिले, त्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केलेच नाही अशी येथील समस्यांवरुन दिसत आहे, येथील जनता सध्या विविध समस्यात आहे, येथील शेतकरी आत्महत्या करत आहे, येथील शेतकरी सध्या विविध समस्या आहे यासह इतर समस्या जिल्ह्यात निर्माण झालेल्या असताना याकडे मात्र कुठेतरी येथील नेत्यांचे दुर्लक्ष होत आहे. येथील नेत्यांना सुचना करुन पवार साहेब येथील समस्या मार्गी लावाव्यात अशी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here