Home Top News पाच क्विंटल कापूस चोरीला; माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

पाच क्विंटल कापूस चोरीला; माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

0
303

शेतीमाल चोरीच्या घटना वाढल्या; शेतकरी चिंताग्रस्त!

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : माजलगाव तालुक्यातील खेर्डा (खुर्द) येथील एका शेतकर्याचा पाच क्विंटल कापूस अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज उघडकिस आली. शेतकर्याच्या फिर्यादीवरुन माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

श्रीमंत अंबादास धोंड (वय ५०, रा. खेर्डा (खूर्द) ता.माजलगाव) यांना अडीच एकर शेती असून यावर्षी त्यांना शेतातुन पाच क्विंटल कापसाचे उत्पन्न झाले होते. हा कापूस त्यांनी शेतातील पञ्याच्या शेड मध्ये ठेवला होता. परंतु आज (ता. २७) शेतकरी धोंड शेतात गेले त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले की, संपुर्ण कापूस चोरीस गेला आहे. यानंतर त्यांनी माजलगाव ग्रामिण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गून्हा नोंद केला आहे. पुढील तपास माजलगाव ग्रामिण पोलीस करत आहेत. सध्या शेतीमाल चोरीच्या घटना जिल्ह्यात वाढल्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here