Home Top News जि. प सदस्य निताताई शिंदे यांनी दिलेल्या शब्दाची केली पूर्तता!

जि. प सदस्य निताताई शिंदे यांनी दिलेल्या शब्दाची केली पूर्तता!

0
134

■ मुर्शदपुर गटातील तवलवाडी व सोलेवाडी ग्रामपंचायत साठी 40 लक्ष रुपये कामाचे उट्घाटन शुभारंभ

| आष्टी प्रतिनिधी :-

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मुर्शदपुर मधील जनतेला निताताई सतीश शिंदे यांनी शब्द दिला होता त्याची आज पूर्तता करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या यांच्या फंडातून व सौ.निताताई सतीश शिंदे प्रयत्नाने जगताप वस्ती ते तवलवाडी/सोलेवाडी 40 लक्ष रुपये निधी जगताप वस्ती ते तवलवाडी रस्त्याचे काम 10 लक्ष , जिल्हा परिषद शाळा नवीन इमारत तवलवाडी 8 लक्ष रुपये, विशेष घटक विहीर 5 लक्ष रुपये, तवलवाडी प पाझर तलाव दुरुस्ती 5 लक्ष रु, तवलवाडी पानी फिल्टर 4.5 लक्ष रुपये , सोलेवाडी पाणी फिल्टर 4.5 लक्ष रु . सोलेवाडी जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती 2.99 लक्ष रु व विविध कामाचे उद्घाटन करताना युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड जिल्हा उपाध्यक्ष सतीश आबा शिंदे, सरपंच डिगांबर पोकळे, सरपंच महादेव कोंडे , सरपंच राहुल जगताप, अशोक तवले, पिराजी तवले , उमेश जगताप, बाबा केरुळकर, महादेव तवले,सतिश कोकणे,दिनेश झगडे , भाऊसाहेब झगडे, शरद झगडे, व इतर मान्यवर व गावकरी उपस्थित होते.
——————————————————————–
जनतेला दिलेल्या शब्दाची पूर्तता करणे हे कर्तव्य! सौ.निताताई शिंदे

निवडणुकीवेळी ज्या पद्धतीने आम्ही जनतेला विश्वासात घेऊन तुमच्या सेवेचा वसा आम्ही उचलू असा शब्द दिला होता त्याच पद्धतीने आम्ही काम देखील केले आहे यापुढे देखील करत राहू जनतेच्या सर्व अडचणी सोडवण्याची जबाबदारी आमचीच आहे याच्यातून मुर्शदपुर गटातील काही गावांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे त्यातच आम्हाला समाधान आहे उर्वरित गावांना देखील मागणीनुसार गरजेनुसार त्यांना निधी उपलब्ध करून दिला जाईल ते आमचं कर्तव्यच आहे.
– सौ.निताताई सतीश शिंदे
जिल्हा परिषद सदस्य बीड.
———————————————————————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here