Home Top News करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी!

करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी!

0
110

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी करुणा शर्मा यांच्यासह एकावर रविवारी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज अंबाजोगाई येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी करुणा शर्मा यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी तर अरुण मोरे यास एक दिवसीय पोलीस कोठडी सुनावली आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका संयोगिनी विशाखा रविकांत घाडगे यांच्या फिर्यादीवरुन करुणा शर्मा व अरुण मोरे यांच्यावर कलम 307, 323, 504, 506, 34 सह ॲट्रोसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. यानंतर आज त्यांना अंबाजोगाई येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याच्या सोबत असणार अरुण मोरे यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास परळी पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here