Home Top News जिल्हा प्रशासन ॲक्शन मोड मध्ये: व्यापाऱ्यांना जिल्हा प्रशासनाचा दणका!

जिल्हा प्रशासन ॲक्शन मोड मध्ये: व्यापाऱ्यांना जिल्हा प्रशासनाचा दणका!

0
88
लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाची कारवाई

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध नियम जिल्ह्यात लागु केलेले आहेत. परंतु या नियमांची अनेकांकडून पायमल्ली होत होती. यामुळे आज जिल्हा प्रशासनाने शहरातील अनेक दुकानांवर कारवाई केली. ही कारवाई उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, पोलीस उपअधिक्षक संतोष वाकळे यांच्यासह नगर पालिकेच्या टिमने केली.

जिल्ह्यात जो नियमांचे पालन करेल त्यालाच नियम आहेत का? असा प्रश्‍न निर्माण झाला होता. परंतु आज करण्यात आलेल्या कारवायांमुळे नियम सर्वांना असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे आकडे वाढत असून नियम तसेच कायम ठेवण्यात आलेले आहेत. परंतु अनेकांकडून नियमांचे उल्लंघन होत होते. यामुळे आज शहरातील सुभाष रोड, बार्शी रोड, जालना रोड, बस स्थानक परिसर यासह इतर ठिकाणी नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाच्या वतिने कारवाया करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here