तीन तालुक्यात दहा पेक्षाही कमी रुग्ण
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण कमी जास्त होत आहेत. आज प्राप्त झालेल्या अहवालात 181 नव्या रुग्णांची भर पडली. यात तीन तालुक्यात दहा पेक्षा कमी रुग्ण आढळून आले.
आज दुपारी आरोग्य विभागाकडून 4187 अहवालचा रिपोर्ट प्राप्त झाले यात 4006 रिपोर्ट निगेटिव्ह तर 181 अहवाल पॉझिटिव्ह आले. अंबाजोगाई 04, आष्टी 49, बीड 24, धारुर 06, गेवराई 17, केज 10, माजलगाव 10, परळी 02, पाटोदा 32, वडवणी 10 असे एकूण 181 रुग्ण जिल्ह्यात वाढले.




















