Home Top News दरोडेखोरांची टोळी जेरबंद: स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

दरोडेखोरांची टोळी जेरबंद: स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

0
81
 14 गुन्हे उघड करत अडीच लाखाचा मुद्देमाल केला जप्त

प्रारंभ वृत्तसेवा

बीड :  जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यात घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळ्या असून तयात चार जणांना जेरबंद करण्यात आले आहे. यासह त्यांच्याकडून  सहा तोळे सोन्यासह 68 हजार रुपये नगदी असा  एकूण 2 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यासह एक दुचाकी जप्त केली. आता पर्यंत त्यांनी 14 ठिकाणी दरोडे चोऱ्या केल्याची माहिती पोलीसांना दिली आहे.

जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरुर येथे गेल्या काही वर्षात अनेक दरोडे, चोऱ्या झालेल्या आहेत.  यात पाटोदा तालुक्यातील नफरवाडी येथील नामदेव विठ्ठल मंडलीक यांचे भरदिवसा घर फोडले होते. याप्रकरणी त्यांनी पाटोदा पोलीसात रितसर तक्रार दिली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतांना स्थानीक गुन्हे शाखेला या दरोडेखोराच्या टोळीबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी काल आष्टीत सापळा रचून चौघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांची पोलीसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी 14 गुन्हे केल्याची कबूली दिली. यात एक रोड रॉबरी तर 13 घरफोड्या करुन लाखोचा मुद्देमाल हडप केला आहे. पोलीसांनी चौघांनाही ताब्यात घेतले. तेव्हा त्यांच्याजवळ 6 तोळे सोने, 68 हजाराची कॅश व एक मोटार सायकल मिळून आली. पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या पैकी नवनाथ उर्फ मटक्या ईश्‍वर भोसले(रा. बेलगांव ता.कर्जत, जि.अहमदनगर, वय-20 वर्षे,) दिपक उर्फ पल्या ईश्‍वर भोसले (रा. बेलगांव ता.कर्जत, जि.अहमदनगर, वय-28 वर्षे,) गहिनीनाथ ईश्‍वर भोसले (रा. बेलगांव ता.कर्जत, जि.अहमदनगर, वय-33 वर्षे,) चिमन्या मैदान भोसले (रा. कासारी ता.केज.जि.बीड  वय-36 वर्षे,)हे आहेत. नफरवाडीत घरफोडीत गहिनीनाथ हा नव्हता गहिनीनाथ यांने नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडी केली होती. त्याच्या शोधात नेकनूर पोलीस होते. स्थानीक गुन्हे शाखेने या चौघांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांनी 14 गुन्हे केल्याची कबूली दिली. पुढील तपासासाठी चौघांना पाटोदा पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. सदरील कारवाई स्थानीक गुन्हे शाखेचे पिआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पिएसआय संतोष जोंधळे, पिएसआय भगत दुल्लत, जगताप, डोळस, शेख नसीर, रामदास तांदळे, प्रसाद कदम, सतिष कातखडे, सोमनाथ गायकवाड, मुन्ना वाघ, अशोक दुबाले, नरेंद्र बांगर, बागवान, पवार, ठोंबरे, कुळेकर, वंजारे, हरके, हराळे यांनी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here