Home Top News दिलासादायक: परळी तालुक्यात आज एकही कोरोना रुग्ण नाही

दिलासादायक: परळी तालुक्यात आज एकही कोरोना रुग्ण नाही

0
76

4183 अहवालात 148 अहवाला पॉझिटिव्ह

जिल्ह्यातील चार तालुक्यात दहापेक्षाही कमी रुग्ण

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात कधी कमी तर कधी जास्त रुग्ण आढळून येत आहेत. आज परळी तालुक्यात एकही कोव्हीड रुग्ण आढळून आलेला नाही. आज 4183 अहवाला प्राप्त झाले यात 148 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. जिल्ह्यातील चार तालुक्यात दहापेक्षाही कमी रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत असली तरीही अजून काही दिवस सर्वांनाच कोव्हीड नियमांचे पालन करावा लागणार आहे.

आज दुपारी आरोग्य विभागाकडून 4183 अहवाल प्राप्त झाले यात 4035 अहवाला निगेटिव्ह आले तर 148 अहवाल पॉझिटिव्ह आले. अंबाजोगाई 13, आष्टी 22, बीड 22, धारुर 04, गेवराई 28, केज 14, माजलगाव 05, पाटोदा 16, शिरुर 17, वडवणी 07 असे रुग्ण जिल्ह्यात आढळून आले. परळी तालुक्यात आज एकही रुग्ण आढळून आला नाही ही बाब परळीकरांसाठी दिलासादायक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here