Home Top News 2917 अहवाला पैकी 147 अहवाल पॉझिटिव्ह!

2917 अहवाला पैकी 147 अहवाल पॉझिटिव्ह!

0
89

चार तालुक्यात दहा पेक्षाही कमी रुग्ण

आष्टी बीड तालुक्यात जास्त रुग्ण

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : आज प्राप्त झालेल्या 2917 अहवाला पैकी 147 अहवाल पॉझिटिव्ह आले. यात चार तालुक्यात दहा पेक्षाही कमी रुग्ण आढळून आले आहेत. पण बीड व आष्टी तालुक्यात मात्र रुग्णांची संख्या वाढु लागली आहे. अजूनही कोरोना गेलेला नाही यामुळे जिल्हाकरांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करण्याची गरज आहे.

आज दुपारी आरोग्य विभागाकडून 2917 अहवालचा रिपोर्ट प्राप्त झाला यात 2727 अहवाल निगेटिव्ह आले तर 147 अहवाला पॉझिटिव्ह आले. अंबाजोगाई 12, आष्टी 29, बीड 31, धारुर 06, गेवराई 13, केज 11, माजलगाव 07, परळी 03, पाटोदा 14, शिरुर 15 व वडवणी 06 असे रुग्ण जिल्हाभरात आढळून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here