Home Top News कोरोना अपडेट: तीन तालुक्यात दहापेक्षा कमी रुग्ण

कोरोना अपडेट: तीन तालुक्यात दहापेक्षा कमी रुग्ण

0
80

जिल्ह्यात आज १४६ रुग्ण वाढले

प्रारंभ । वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यामध्ये आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये तीन तालुक्यामध्ये दहापेक्षा कमी रुग्ण आढळून आले. यामध्ये गेवराई, शिरूर, वडवणी या तीन तालुक्याचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यात आज 146 नव्या रुग्णांची भर पडली. आज दुपारी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या 2813 अहवालापैकी 2667 अहवाल निगेटिव्ह आले तर 146 अहवाल पॉझीटिव्ह आले. यात अंबाजोगाई-13, आष्टी-16, बीड-22, धारूर-13, गेवराई-9, केज-26, माजलगाव-12, परळी-13, पाटोदा-11, शिरूर-8, वडवणी-3 असे रुग्ण जिल्ह्यात आढळून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here