Home Top News दिलासादायक : पाच तालुक्यात कोरोनाचा आकडा 10 पेक्षा कमी

दिलासादायक : पाच तालुक्यात कोरोनाचा आकडा 10 पेक्षा कमी

0
78

जिल्ह्यात आज 132 रुग्ण

प्रारंभ । वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात आता कोरोनाचा आकडा मंदावत असून आज जिल्हाभरात 132 रुग्ण वाढले. यामध्ये पाच तालुक्यात तर 10 पेक्षाही कमी रुग्ण आढळून आले. जिल्ह्यामध्ये कोरोनाचा आकडा कमी होत असल्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेसह जिल्हाकरांना याचा फायदा होत आहे.
आज दुपारी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या 3100 अहवालापैकी 2968 अहवाल निगेटिव्ह आले तर 132 अहवाल पॉझीटिव्ह आले. यात अंबाजोगाई-23, आष्टी-28, बीड-14, धारूर-5, गेवराई-4, केज-23, माजलगाव-10, परळी-1, पाटोदा-9, शिरूर-11, वडवणी-4 असे रुग्ण आढळले. जिल्ह्यात रुग्ण कमी होत असल्यामुळे जिल्हाकरांना दिलासा मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here