Home Top News पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेला सदृढ करण्यासाठी मिळवून...

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेला सदृढ करण्यासाठी मिळवून दिल्या 8 नव्या रुग्णवाहिका

0
84

अंबाजोगाई (दि. 25)  : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याच्या कोविड आढावा बैठकीनंतर राज्य शासनाकडे पाठपुरावा कडून आरोग्य विभागाकडून बीड जिल्ह्यात 8 नव्या रुग्णवाहिका (अँबुलन्स) उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व 8 अँबुलन्स ऑक्सिजन सह अन्य सर्व सुविधायुक्त असून आज सकाळी त्या बीड जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत.

आरोग्य विभागाने पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार आरोग्य संचालक स्तरावरून खरेदी प्रक्रिया राबवून आरोग्य उपसंचालक लातूर यांच्यामार्फत या 8 अँबुलन्स बीड जिल्हा आरोग्य विभागाला सुपूर्द केल्या आहेत.

यापैकी 2 अँबुलन्स बीड जिल्हा रुग्णालयात, 2 स्त्री रुग्णालय लोखंडी सावरगाव ता. अंबाजोगाई, परळी उपजिल्हा रुग्णालय 1, केज उपजिल्हा रुग्णालय 1, गेवराई उपजिल्हा रुग्णालय 1, धानोरा ग्रामीण रुग्णालय 1 याप्रमाणे वितरित केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते यांनी दिली आहे.

पालकमंत्री धनंजय मुंडे हे कोविड नियंत्रण, उपचार व उपाययोजनांच्या प्रत्येक बाबीवर बारकाईने लक्ष ठेऊन, आवश्यक सामग्री साठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. जिल्ह्यातील जनतेला कोरोनापासून सुरक्षित ठेवणे हे आपले लक्ष्य असून, बाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी काहीही कमी पडू देणार नाही, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. दरम्यान जिल्ह्यात 8 नव्या अँबुलन्स दाखल झाल्याने रुग्ण वाहतुकीत येणाऱ्या अडचणींना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here