Home Top News धक्कादायक: रुग्णालयात लागलेले आगीत होरपळून १३ रुग्णांचा मृत्यू

धक्कादायक: रुग्णालयात लागलेले आगीत होरपळून १३ रुग्णांचा मृत्यू

0
578

विरार पश्चिम येथील दुर्दैवी घटना

प्रारंभ वृत्तसेवा

मुंबई: विरार मधील एका कोविड वार्डातील अतिदक्षता विभागात एसीचा स्फोट झाल्याने आग लागली. यात १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहै.

नाशिकची घटना ताजी असतानाच आज विरार येथील दुर्दैवी घटनेने दिवसाची सुरुवात झाली आहे. मुंबईतील विरार येथील कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील एसीचा स्फोट झाल्याने मोठी आग लागली. यात १३ रुग्णांचा होरपळून मत्यू झाला. या वार्डात एकूण १७ रुग्णांवर उपचार सुरु होते. ही आग मध्यराञी साडेतीनच्या दरम्यान लागली होती. घटनास्थळी १० अग्निशमनचा गाड्या दाखल झाल्या होत्या. काही वेळात अग्निशमनला आग विझवण्यात यश आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here