Home Top News कोरोना अपडेट: जिल्ह्यात आज १२११ रुग्ण वाढले!

कोरोना अपडेट: जिल्ह्यात आज १२११ रुग्ण वाढले!

0
485

अंबाजोगाई तालुक्यात सर्वात जास्त रुग्ण आढळले

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे आकडे वाढतच असून आज तर जिल्ह्यात १२११ नव्या रुग्णांची भर पडली. यात अंबाजोगाई तालुक्यात सर्वात जास्त रुग्ण सापडले.

आज दुपारी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या ४२६२ अहवाला पैकी ३०५१ अहवाल निगेटिव्ह आले तर १२११ अहवाल पाॅझिटिव्ह आले. यात अंबाजोगाई तालुका ३३७, बीड तालुका १४३, परळी तालुका १३८, केज तालुका ११२, माजलगाव तालुका ६५, आष्टी तालुका ११९, पाटोदा ९९, शिरुर ५३, धारुर ४७, वडवणी ५९ व गेवराई ३९ असे रुग्ण जिल्हाभरात मिळून आले. रुग्ण संख्या वाढतच असल्यामुळे जिल्ह्याच्या चिंतेत भर पडत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here