Home Top News धक्कादायक ! जिल्ह्यात बारा कोरोनाबाधितांचा मृत्यू!

धक्कादायक ! जिल्ह्यात बारा कोरोनाबाधितांचा मृत्यू!

0
2125
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची संख्या वाढली
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यामध्ये काल दुपारी 2 वाजल्यापासून आज सकाळपर्यंत 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद कोविड सेंटरमधील 8 रुग्ण, लोखंडी सावरगाव येथील 1 व बीड येथील 3 असे एकूण 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी धक्कादायक असून दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधितांची मृत्यूची संख्या वाढल्यामुळे जिल्ह्यात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील चित्र बदलले असून मोठठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. त्यासह मृत्यूदरही वाढताना दिसत आहे. तीन दिवसांपूर्वी अंबाजोगाईमध्ये 8 जण कोरोनाने दगावले होते. त्यांना एकाच चितेवर अग्नीडाग दिला होता. हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर पसरल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. यानंतर आज परत जिल्ह्यात 12 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून हे रुग्ण 50 वयोगटाच्या पुढील आहेत. एवढे मोठे रुग्ण एका दिवसात मृत झाल्यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन काम करत असले तरीही जिल्ह्यात कोरोना रोखण्यात जिल्हा प्रशासनाला अपयश येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here