Home Top News कालच्या तुलनेत आज कोरोनाचा आकडा कमी!

कालच्या तुलनेत आज कोरोनाचा आकडा कमी!

0
1281

अंबाजोगाई, आष्टी, बीड तालुक्यात जास्त रुग्ण

प्रारंभ । वृत्तसेवा

बीड : काल जिल्ह्यामध्ये 716 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली होती. आज परत जिल्ह्यात 580 रुग्ण वाढले असून यात बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण असल्यामुळे बीड तालुक्यासह जिल्ह्याची चिंता वाढताना दिसत आहे.
आज दुपारी आरोग्य विभागाकडून 3529 अहवालाचा रिपोर्ट प्राप्त झाला. यात 2949 रिपोर्ट निगेटिव्ह आले तर 580 रिपोर्ट पॉझीटिव्ह आले. यात बीड-146, अंबाजोगाई-114, आष्टी-71, धारूर-15, गेवराई-36, केज-50, माजलगाव-39, परळी-60, पाटोदा-18, शिरूर-21, वडवणी-10 अशा नव्या रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात वाढत असलेल्या आकड्यामुळे आरोग्य विभागासह जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here