Home Top News मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲड. धर्मपाल मेश्राम ॲक्शन मोडमध्ये; विविध समस्यांचा घेतला आढावा

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲड. धर्मपाल मेश्राम ॲक्शन मोडमध्ये; विविध समस्यांचा घेतला आढावा

0
73

नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील भाजपचे शीर्षस्थ नेते ॲक्शन मोडवर आले आहेत. भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी आता नागरिकांच्या समस्या केंद्रस्थानी ठेवून बैठका घेणे सुरू केले आहे. नुकतीच त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या नेहरूनगर झोन अंतर्गत प्रभाग २६ मधील विविध समस्यां

चा आढावा घेतला. नागरिकांकडून प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने ॲड. मेश्राम यांनी मनपाच्या अधिका-यांशी चर्चा करून जनतेच्या समस्यांकडे लक्ष वेधले.

प्रभाग २६ मध्ये घरगुती विजेची तक्रार तसेच अनेक दिवसांपासून पथदिवे बंद असल्याबाबत तक्रार ॲड. मेश्राम यांच्याकडे प्राप्त झाली. त्यांनी याबाबत आढावा घेतला. प्रभाग क्र २६ येथील घरगुती वीजेच्या तक्रारी संदर्भात महावितरण अधिकारी व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ता नागरिकांची संयुक्त बैठक त्यांनी घेतली. याशिवाय नादुरूस्त पथदिवे तात्काळ दुरुस्त करावे व आवश्यक त्या ठिकाणी नवे लाइट्स लावून सेवा पूर्ववत सुरु करण्याबाबत त्यांनी विद्युत विभागाला सूचना केली.

बैठकीला महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राठोड, प्रकाश रुद्रकार, कार्यकारी अभियंता टेकाडे, उपअभियंता बारापात्रे, अभियंता माहाडिक, सहायक अभियंता अशोक भोतमांगे, भाजपा प्रभाग अध्यक्ष सुरेश बारई, अशोक देशमुख, सुनील आग्रे, रवी धांडे, रामचरण बेनिया, कल्पना सर्वे, सिंधू परातें उपस्थित होते.

कार्यकर्त्यांशी चर्चा करताना ॲड. धर्मपाल मेश्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here