Home Top News धांडे, शेख, जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

धांडे, शेख, जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

0
72

सुदर्शन धांडे, शेख निजाम व संतोष जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : शहरातील तीन युवा नेत्यांनी आज (ता. २१) मुंबईमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन मानले यामध्ये युवा नेते सुदर्शन धांडे, शेख निजाम व संतोष जाधव यांचा समावेश आहे

बीड जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असून यामध्ये बीड नगरपालिकेचा समावेश आहे. याच अनुषंगाने प्रत्येक पक्षाकडून पक्ष बांधणी सुरू आहे. याच अनुषंगाने आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या उपस्थितीमध्ये बीड शहरातील सुदर्शन धांडे, शेख निजाम व संतोष जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या तिघांनाही शिवबंधन बांधले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here