Home Top News छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराचे काम दर्जाहीन;शिवप्रेमी आक्रमक

छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराचे काम दर्जाहीन;शिवप्रेमी आक्रमक

0
78

प्रारंभ वृत्तसेवा

बीड ; छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराचे होत असलेले काम दर्जाही होत असल्यामुळे शिवप्रेमी आक्रमक झाले असून शिवप्रेमींनी आज (ता. १८) शिवाजी महाराज चौक परीसरात आंदोलन सुरू केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराचे काम दर्जेदार करण्याची सर्व शिवप्रेमींची मागणी.

बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराचे सुशोभीकरण नगरपालिकेच्या वतीने सुरू आहे. परंतु हे काम काम दर्जाहीन होत असून या कामाची कोणतीही वर्क ऑर्डर काढण्यात आलेली नाही शिवाय हे काम फक्त पैसे लाटण्यासाठी होत आहे असे मत शिवप्रेमींच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. जोपर्यंत हे काम दर्जेदार होत नाही तोपर्यंत सुरू असलेले काम आम्ही सुरू होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका शिवप्रेमींच्या वतीने घेण्यात आली. घटनास्थळी नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीता अंधारे दाखल झाले असून त्यांच्याशी आंदोलन करण्याची चर्चा सुरू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here