Home Top News केज तालुक्यातील आनेगाव ग्रामपंचायत बिनविरोध ; दशरथ भाऊ इंगळे यांच्या प्रयत्नाला आले...

केज तालुक्यातील आनेगाव ग्रामपंचायत बिनविरोध ; दशरथ भाऊ इंगळे यांच्या प्रयत्नाला आले यश

0
88

केज/ प्रतिनिधी

केज तालुक्यात ६६ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या होत्या परंतु आनेगाव येथील दशरथ भाऊ इंगळे आणी श्रीराम इंगळे या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आनेगाव ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यात त्यांना यश आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,आनेगाव येथील दशरथ भाऊ इंगळे आणी श्रीराम इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन विचार विनिमय करून सर्वानुमते आनेगाव ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे ठरवले आणी सर्व ग्रामस्थांनी मिळून ग्रामपंचायतची कार्यकारणी ठरवली यामध्ये सौ.ज्ञानेश्वरी अशोक गवळी सरपंच तर सदस्य महादेव नारायण इंगळे,सौ.शोभा रामप्रसाद हांडीबाग,सौ.दिपाली दशरथ हांडीबाग, सौ.शुभांगी पद्माकर हांडीबाग,सौ.इंदुबाई कविदास रामगुडे अनुसुचीत जाती महिला, रमेश हरिदास हांडीबाग, ज्ञानेश्वर सुधाकर हांडीबाग यांची सर्वानुमतेबिनविरोध निवड करण्यात आली.
आनेगावची ग्रामपंचायत ही बिनविरोध निवड झाल्यामुळे केज तालुक्यातून आनेगावच्या ग्रामस्थांचे आणी मार्गदर्शकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here