Home Top News सोमवारच्या बंद मध्ये शिवप्रेमींंसह शिवसैनिकांनी सहभागी व्हावे – अनिल जगताप

सोमवारच्या बंद मध्ये शिवप्रेमींंसह शिवसैनिकांनी सहभागी व्हावे – अनिल जगताप

0
70

बीड : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी केलेल्या अक्षम्य विधानामुळे शिवप्रेमी नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे. याचा निषेध म्हणून सोमवार दि.12 रोजी शिवप्रेमींकडून जिल्हा बंद पाळण्यात येणार आहे. यात शिवसैनिकांसह नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात अनिल जगताप यांनी म्हटले आहे की, भगतसिंग कोश्‍यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेले अक्षम्य विधान पुर्णता चुकिचे असून ते निषेधार्ह आहे. कोश्‍यारी यांच्या विधानबरोबरच भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, मंगलप्रसाद लोढा, रावसाहेब दानवे, प्रसाद लाड यांनीही अक्षेपार्ह विधाने केली आहेत. या सर्वांचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींनी सोमवार दि.12 रोजी जिल्हा बंद ची हाक दिली आहे. या बंदमध्ये शिवसेना सहभागी असून, शिवसेनेच्यावतीने बंदचे आवाहन करण्यात येत आहे. हा बंद उत्स्फुर्त आणि शांततेत पाळण्याचे आवाहन करण्याबरोबरच या बंद मध्ये सर्व संस्थांनी, नागरिकांनी सहभाग होण्याचे आवाहनही जगताप यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here