Home Top News बीडजवळील कुंटणखाण्यावर छापा; दोघांना अटक, चार पिडितांची सुटका

बीडजवळील कुंटणखाण्यावर छापा; दोघांना अटक, चार पिडितांची सुटका

0
69

बीड । प्रतिनिधी : शहराजवळील ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये बाहेर राज्यातील व जिल्ह्या बाहेरील महिलांना बोलावून वेश्‍याव्यवसाय करायला लावणाऱ्या कुंटनखाण्यावर बीड ग्रामीण पोलीसांनी छापा टाकून दोन जणांना अटक केली आहे तर चार पीडितांची सुटका करण्यात आली आहे.

बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चऱ्हाटा फाटा परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये वेश्‍याव्यवसाय करत असल्याची माहिती ग्रामीण पोलीसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्या अनुषंगाने ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नि.साबळे यांनी मंगळवारी रात्री उशिरा त्याठिकाणी टाकून छापा टाकत चार पीडित महिलांची सुटका केली तर दोघाजणांना बेड्या ठोकल्या. याठिकाणी दोन मोबाईलसह रोखरक्कम 21 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक श्री राजपूत यांच्या फिर्यादीवरून सुरज नवनाथ भोसले, मारोती उर्फ विशाल रघुनाथ मिटकर या दोघांविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here