Home Top News शेतकऱ्याच्या घरातील सोने व नगदी रकमेसह सहा लाखांचा मुद्देमाल लंपास

शेतकऱ्याच्या घरातील सोने व नगदी रकमेसह सहा लाखांचा मुद्देमाल लंपास

0
80

आष्टी । प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील शेकापूर येथील शेतकरी दुपारी शेतामध्ये घराला कुलूप लावून काम करण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी घरातील लोखंडी पेटीत ठेवलेले सोने व नगद रक्कम असा एकूण पाच लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
भाऊसाहेब किसन फुंदे (वय 65 वर्षे) रा.शेकापूर हे मंगळवारी दुपारी शेतामध्ये कामासाठी गेले असता त्यांच्या घरातील लोखंडी पेटीत ठेवलेले सोने
व नगदी सतरा हजाराची रक्कम असा एकूण पाच लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून लंपास केला. सायंकाळी शेतातून घरी आल्यानंतर फुंदे यांच्या हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आष्टी पोलीसात जावून फिर्याद दिल्यामुळे अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास आष्टी पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here