Home Top News जनविकास बांधकाम कामगार संघटना केज आणी इतर संघटनेच्या वतीने बांधकाम मजुरांना पेटी...

जनविकास बांधकाम कामगार संघटना केज आणी इतर संघटनेच्या वतीने बांधकाम मजुरांना पेटी सुरक्षा संच ई-श्रम कार्डचे वाटप कार्यक्रम संपन्न

0
73

केज /प्रतिनिधी : तालुक्यातील व शहरातील बांधकाम मजुरांना पेटी आणी सुरक्षा संचा सह ई-श्रम कार्ड व बांधकाम मजूर कार्ड, अत्यावश्यक संच वाटपाचा कार्यक्रम संपन्न

जनविकास बांधकाम संघटनेचे अध्यक्ष तथा जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली जनविकास बांधकाम मजूर संघटना आणी इतर संघटनेच्या वतीने शहरातील जनविकास बांधकाम मजूर संघटना कार्यालय केज येथे बांधकाम मजुरांना पेटी, सुरक्षा संच, ई-श्रम कार्ड, बांधकाम मजूर कार्ड, व अत्यावश्यक संच संघटनेचे अध्यक्ष हारुणभाई इनामदार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी केज नगरपंचायत चे गटनेते राजू भाई इनामदार, मोहसीन शेख, शाहेद शेख यांच्यासह अनेक मान्यवर आणी जनविकास परिवर्तन आघाडीचे कार्यकर्ते व जनविकास बांधकाम मजूर संघटनेचे पदाधिकारी व बांधकाम मजूर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here