Home Opinion & Analysis संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

0
94

मुंबई । प्रतिनिधी : शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना आज पीएमएलए न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे. न्यायालयाने त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मागील काही दिवसांपासून ते ईडी (सक्तवसुली संचालनालय) कोठडीत होते. पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी केली होती.
पीएमएलए कायद्यानुसार, संजय राऊत यांना आज पुन्हा ईडी कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडीत पाठवलं जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण न्यायालयाने संजय राऊत यांना काहीसा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना 22 ऑगस्टपासून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे 22 ऑगस्टनंतर संजय राऊत यांना जामीन मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे.
आजपासून संजय राऊत यांचा मुक्काम मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असणार आहे. संजय राऊत ईडी कोठडीत असताना त्यांना काही सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव राऊतांना त्याच प्रकारच्या सुविधा कारागृहात पुरवल्या जाव्यात, अशी मागणी संजय राऊत यांच्या वकिलांनी केली आहे. घरचं जेवणं, औषधं आणि हवेशीर खोली मिळावी, अशी मागणी राऊतांच्या वकिलांनी केल्याची माहिती समजत आहे.
शनिवारी (6 ऑगस्ट) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीने 8 तासांहून अधिक काळ चौकशी केली आहे. यावेळी ईडीने त्यांचा सविस्तर जबाब नोंदवला आहे. “काहीही झालं तरी आम्ही शिवसेना पक्ष सोडणार नाही, आम्ही कायम उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत,” असं मत वर्षा राऊत यांनी ईडीच्या चौकशीनंतर व्यक्त केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here