Home Top News श्रावण सोमवार निमित्त धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठाण कडून वैद्यनाथ मंदिरात आकर्षक फुलांची...

श्रावण सोमवार निमित्त धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठाण कडून वैद्यनाथ मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

0
74

धनंजय मुंडेंनी घेतले प्रभू वैद्यनाथांचे दर्शन

प्रत्येक श्रावण सोमवारी सुंदर फुलांची आरास व मंदिराची नाथ प्रतिष्ठाण कडून सजावट करणार – धनंजय मुंडे

परळी : – श्रावण सोमवार व पुत्रदा एकादशी असा सुंदर संगम आज साधला असून, यानिमित्ताने माजी मंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेमार्फत संपूर्ण वैद्यनाथ मंदिर विविध फुलांच्या सजावटीने बहरले असून अत्यंत आकर्षक सजावट व विविध आकर्षक फुलांची आरास मंदिर परिसर, गाभारा व सर्व ठिकाणी करण्यात आली आहे.

धनंजय मुंडे यांनी आज सकाळी वैद्यनाथ मंदिरात जाऊन प्रभू वैद्यनाथांचे मनोभावे दर्शन घेतले व विधिवत पूजन केले. मंदिर गाभारा व परिसरात झेंडूसह निशिगंधा, गुलाब, जरबेरा, शेवंती, अर्केट, लिलिअम, ब्लुडेझी यासह सुमारे 21 प्रकारातील 7 क्विंटल फुलांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराचे अनन्य साधारण महत्व आहे, पवित्र श्रावण महिन्यात या ठिकाणी देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात; त्यामुळे प्रत्येक श्रावण सोमवारी याच पद्धतीने नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने मंदिरात आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजावट करण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here