Home Top News बीड मध्ये शिवसैनिक आक्रमक; बंडखोर नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

बीड मध्ये शिवसैनिक आक्रमक; बंडखोर नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

0
69

जिल्ह्यातील  मतदार संघात भगवा फडकवणार — युवा नेते किशोर जगताप

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील आघाडी सरकार घोक्यात आल्यानंतर आता राज्यातील शिवसैनिक माञ आक्रमक झाले आहेत. आज (ता. २७) बीड मध्ये शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत बंडखोर नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिकांनी मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांना समर्थन देत, घोषणाबाजी केली. यावेळी माञ काही वेळ वाहतुक कोंडीचा सामना शहरकरांना करावा लागला.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची बंड केल्यानंतर आघाडी सरकार धोक्यात आले. यानंतर गेल्या आठ दिवसापासून संपुर्ण देशाचे लक्ष राज्यातील राजकारणाकडे लागलेले असताना, आता शिवसैनिक सुद्धा आक्रमक झाले आहेत. आज बीड शहरातील आण्णाभाऊ साठे चौकात शिवसैनिकांनी एकञ येत बंडखोर नेत्यांविरोधात जोरदार घोषणा देत निषेध केला. तसेच यासह मुख्यमंञी उद्धव ठाकरे, मंञी आदित्य ठाकरे यांचे फोटो हातात घेतले होते. यावेळी शिवसैनिकांचा रोष पाहावयास मिळाला. यावेळी युवा नेते किशोर जगताप म्हणाले की, येणार्या निवडणूकीत बीड जिल्ह्यातील सहाही मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here