Home Top News विधानपरिषदेसाठी परत पंकजा मुंडे यांना डावलले…!

विधानपरिषदेसाठी परत पंकजा मुंडे यांना डावलले…!

0
71

आ.विनायक मेटे यांचा सुद्धा पत्ता कट

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूका होत असून यात भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता होती. परंतू भाजपाच्या वतिने जाहिर करण्यात आलेल्या यादी त्यांचे नाव नसल्यामुळे परत त्यांना डावलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. यासह आ. विनायक मेटे यांचा सुद्धा यावेळेस पत्ता कट करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांना परत डावलल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी निर्माण झाली आहे.

भाजपाच्या वतिने आज विधानपरिषदेसाठी एक यादी जाहिर करण्यात आली असून यात प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांची नावे घेण्यात आली आहेत. यामुळे यावेळेस सुद्धा पंकजा मुंडे यांना पक्षाच्या वतिने संधी देण्यात आलेली नाही. यासह शिवसंग्रामचे संस्थापक तथा आ.विनायक मेटे यांना सुद्धा यावेळेस भाजपाने संधी दिलेली नाही. यामुळे मेटेंसाठी हा खुप मोठा फटका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here