Home Top News खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी सारिका क्षीरसागर उतरल्या रस्त्यावर

खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी सारिका क्षीरसागर उतरल्या रस्त्यावर

0
69

सत्तेचा गैरवापर करुन खोटे गुन्हे नोंद केले -सारिका क्षीरसागर

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या गोळीबारात आमचा काहीच संबंध नसतानाही  डॉ. भारतभुषण क्षीरसागर व डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यावर सत्तेचा गैरवापर करुन खोटे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी सारिका क्षीरसागर रस्त्यावर उतरल्या असून त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात पायी जाऊन पोलीस अधीक्षक यांना  निवेदन दिले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवकांची प्रमुख उपस्थिती होती.

जमिनीच्या वादातुन काल जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोळीबार झाल्यानंतर शहरात खळबल उडाली होती. या प्रकरणात रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या निषेर्धात आज सारिका क्षीरसागर, शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक यांनी रस्त्यावर उतरुन निषेध केला. पोलीसांनी या घटनेची कोणतीच खातरजमा न करता गुन्हे नोंद केले आहेत. सत्ताधारी सत्तेचा गैरवापर करत आहेत यासह इतर मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here