Home Top News परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्विकारण्याला 30 जून पर्यंत मुदतवाढ – धनंजय मुंडे

परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्विकारण्याला 30 जून पर्यंत मुदतवाढ – धनंजय मुंडे

0
77

अनुसूचित जातीतील इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!*

मुंबई राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मुदतीत 30 जून पर्यंत वाढ करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

या योजनेंतर्गत परदेशी नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना 18 जून 2021 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती, परंतु बहुतांश विद्यार्थ्यांना परदेशातील संबंधित विद्यापीठांकडून कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विहित मुदतीत ऑफर लेटर प्राप्त न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी ना. मुंडेंकडे मुदत वाढ देण्याबाबत विनंती केली होती.

त्यानुसार धनंजय मुंडे यांनी विभागाला निर्देश देत ही मुदत 30 जून पर्यंत वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने अनुसूचित जातीतील इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

परदेश शिष्यवृत्ती साठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 30 जूनच्या आत आपले अर्ज दाखल करून घ्यावेत असे आवाहन समाज कल्याण आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here