Home Top News दिलासादायक : लवकरच जिल्हा कोरोनामुक्त

दिलासादायक : लवकरच जिल्हा कोरोनामुक्त

0
91

बीड । प्रतिनिधी

जिल्ह्यामध्ये आज कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांमध्ये घट झाली असून आज जिल्ह्यात 155 रुग्ण आढळले. यात अंबाजोगाई-18, बीड-20 रुग्ण आढळले. या दोन तालुक्यात पाहिले तर रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत होते परंतु आज या दोन तालुक्यात रुग्णसंख्या कमी आली.
आरोग्य विभागाकडून दुपारी प्राप्त झालेल्या 2845 अहवालापैकी 2690 अहवाल निगेटिव्ह तर 155 अहवाल पॉझीटिव्ह यात अंबाजोगाई-18, आष्टी-35, बीड-20, धारूर-11, केज-21, माजलगाव-3, परळी-3, पाटोदा-5, शिरूर-19, वडवणी-7 असे रुग्ण जिल्ह्यात आढळलले. जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे लवकरच जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here