प्रारंभ वृत्तसेवा
बीड : गेवराई तालुक्यातील राज पिंपरी येथील अनंता तुकाराम माने वय वर्षे 21 या युवकाने आज (ता. ०३) पहाटे तीनच्या सुमारास आपल्या स्वतःच्या शेतामधील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. पोलीस अंमलदार उबाळे यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा उप रुग्णालय गेवराई या ठिकाणी पाठवले आहे. गेवराई पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस अंमलदार उबाळे करीत आहेत.




















