Home Top News महंत लक्ष्मण महाराज रामगडकर यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाचे मोठे नुकसान – धनंजय...

महंत लक्ष्मण महाराज रामगडकर यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाचे मोठे नुकसान – धनंजय मुंडे

0
107

*रामगडकर महाराजांना ना. मुंडेंनी अर्पण केली श्रद्धांजली*

मुंबई/बीड (दि. ३०) —- : बीड तालुक्यातील श्री क्षेत्र रामगड येथील मठाधिपती ह.भ.प. महंत लक्ष्मण महाराज रामगडकर यांच्या निधनाने रामगड पोरका झाला असून, वारकरी संप्रदायाचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शोकभावना जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

प्रभू श्रीरामाच्या वास्तव्याने पावन झालेले ठिकाण व थोरला गड म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र रामगडाचे महंत लक्ष्मण महाराज यांचे आज (दि. ३०) खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान देहावसान झाले.

आज संत तुकाराम महाराजांची बीज, आजच्या दिवशी लक्ष्मण महाराजांचे देहावसान होणे हा योगायोग स्मरणात राहील. महाराजांच्या जाण्याचे वृत्त दुःखद असून त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायाचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी ह.भ.प. लक्ष्मण महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here