Home Top News उद्योजक मेळावा आणि गुणवंतांचा सत्कार आज

उद्योजक मेळावा आणि गुणवंतांचा सत्कार आज

0
40
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य
  • साकारदृष्टी सोशल फाऊंडेशन आणि झिरो माईल एक्झिबिशनचे आयोजन

नागपूर : साकारदृष्टी सोशल फाऊंडेशन आणि झिरो माईल एक्झिबिशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, 13 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत काटोल रोड चौक येथील ऑरेंज ग्रीन सेलिब्रेशन हॉल येथे उद्योजक/उद्योजिका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून याच ठिकाणी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले आहे.

या मेळाव्यात विविध खाद्यपदार्थ, हस्तकला व नावीन्यपूर्ण वस्तू, पारंपरिक वस्त्र व दागिने यासह अन्य उपयोगी वस्तूंचे स्टॉल्स राहणार आहे. याच मेळाव्यादरम्यान काही मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहे. मेळाव्यात सहभागी होणाऱ्यांसाठी लकी ड्रॉचे आयोजनही करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मेळाव्याच्या माध्यमातून व्यसनमुक्ती याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन साकारदृष्टी सोशल फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. वैशाली चोपडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here