Home Top News माजलगाव तहसीलमध्ये कोतवाल संघटनेच्या अध्यक्षानेच महिलेची काढली छेड!

माजलगाव तहसीलमध्ये कोतवाल संघटनेच्या अध्यक्षानेच महिलेची काढली छेड!

0
1784

विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल.

बाळासाहेब आडागळे माजलगाव.

माजलगाव तहसील मध्ये कार्यरत असणाऱ्या एका कोतवालाने कार्यालयातच महिला कर्मचाऱ्यांची छेडछाड केल्याची घटना 9 मार्च रोजी घडली. दरम्यान पीडित महिलेने गुरुवार दिनांक 25 रोजी कोतवाला विरुद्ध ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माजलगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार पीडित महिला व खरात आडगाव येथील कोतवाल कुंडलिक लिंबाजी आढाव हे माजलगाव तहसील येथे कार्यरत आहेत.9 मार्च 2021 रोजी पीडित महिला आपल्या कार्यालयात कार्यालयीन काम करत असताना कोतवाल कुंडलिक आढाव याने संबंधित महिलेस अश्लील भाषेत शेरेबाजी करत छेड काढली.व पाठीमागून महिलेस धरून मिठी मारली.दरम्यान पीडित महिलेने प्रत्यक्ष हजर होत माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुरुवार दि.25 मार्च रोजी आरोपी कुंडलिक लिंबाजी आढाव (कोतवाल)याच्याविरुद्ध भादवि (कलम 354) विनयभंगसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.प्रकरणाचा पुढील तपास पो.नि. धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here