Home Top News जिल्ह्यात आज सुद्धा कोरोना सुसाट!

जिल्ह्यात आज सुद्धा कोरोना सुसाट!

0
806

बीड,  अंबाजोगाई व माजलगाव मध्ये जास्त रुग्ण

बीड । प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन जरी घोषीत केले असले तरी कोरोना मात्र लॉकडाऊन व्हायला तयार नाही. आज जिल्ह्यात 335 नव्या रुग्णांची भर पडली.
आरोग्य विभागाकडून दुपारी प्राप्त झालेल्या 2276 अहवालापैकी 1941 अहवाल निगेटिव्ह आले तर 235 पॉझीटिव्ह आले. यात अंबाजोगाई-90, बीड-106, आष्टी-25, गेवराई-23, धारूर-05, माजलगाव-19, केज-16, परळी-31, पाटोदा-11, शिरूर-4, वडवणी-5 अशा नव्या रुग्णांची भर पडली. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असले तरी त्याला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे आकडे वाढत आहेत. जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी फक्त प्रशासनाने पुढाकार घेवून काहीही होणार नाही. यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करत कोरोनाला हरवण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here