Home Top News केजच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड यांचा सामाजिक कार्यानिमित्त बीड येथे गौरव

केजच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड यांचा सामाजिक कार्यानिमित्त बीड येथे गौरव

0
71

केज/ प्रतिनिधी

जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक कार्याबद्दल कर्तुत्वाचा सन्मान या पुरस्काराने केजच्या नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांना सन्मानित करण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, केजच्या नगराध्यक्षा सौ सिताताई बनसोड यांनी मागील २५ वर्षापासून सामाजिक, राजकीय यासह विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल दिनांक ८ मार्च २०२३ रोजी बीड जिल्हा पोलीस आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक कार्याबद्दल कर्तृत्वाचा सन्मान या पुरस्काराने केजच्या नगराध्यक्षा सौ सिताताई बनसोड यांना बीड जिल्ह्याच्या खासदार मा. प्रीतमताई मुंडे व बीड जिल्हाधिकारी दीपा मॅडम मुधोळ/ मुंडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
याप्रसंगी बीडच्या खासदार मा. प्रीतमताई मुंडे, बीड जिल्हाधिकारी दीपा मॅडम मुधोळ/ मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम, बीड नगर पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीता अंधारे मॅडम यांच्यासह सर्व कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी व सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here