Home Top News नगर रोडच्या खड्ड्यात मच्छी पकडो आंदोलन!

नगर रोडच्या खड्ड्यात मच्छी पकडो आंदोलन!

0
61

रस्त्याचा मला खाणारे मासे गेले कुठे? च्या घोषणा

बीड : शहरातील नगर रोड प्रचंड खराब झाला असून या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मोठी अडचण निर्माण झाले असून त्याचा त्रास वाहन धारकांना होत आहे. याच अनुषंगाने आज (ता. २०) आपच्या वतीने बीड शहरातील खड्ड्यात मच्छी पकडो आंदोलन करण्यात आले. यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी केली.

बीड शहरातील नगर रोड हा गेल्या अनेक महिन्यापासून खराब झाला आहे. या रस्त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात येतात, परंतु हा रस्ता आजपर्यंत दर्जेदार करण्यात आलेला नाही. या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मोठ्या अडचणी येत आहेत याच अनुषंगाने आज आपच्या वतीने शहरातील नगर रोडच्या खड्डे परिसरात मच्छी पकडो आंदोलन करण्यात आले. यावेळी आपच्या वतीने घोषणाबाजी करत रस्तादुरुस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here