Home Top News बीड शहरात या ठिकाणी झाला खून: घटनास्थळी पोलीस दाखल

बीड शहरात या ठिकाणी झाला खून: घटनास्थळी पोलीस दाखल

0
69

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : शहरातील धानोरा रोड परिसरातील पालवन चौक परिसरात आज (ता. २०) सकाळी एक खून झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिवाजी नगर पोलीस दाखल झाले असून मृतदेह जिल्हारुग्णालयात पुढील प्रक्रियेसाठी नेण्यात आला आहे.

दत्ता राधाकिशन इंगळे वय ४०, (रा. हिवरसिंगा ता. शिरुर कासार) असे मयताचे नाव आहे. मयत बीड शहरातील एका हाॅटेल मध्ये काम करत होता. शिवाजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड व त्यांची टिम घटनास्थळी दाखल असून पुढील  तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here