Home Top News खांडे पारगावमध्ये रा.काँ.ला धक्का विलास आमटे यांचा माजी मंत्री क्षीरसागरांच्या गटात जाहीर...

खांडे पारगावमध्ये रा.काँ.ला धक्का विलास आमटे यांचा माजी मंत्री क्षीरसागरांच्या गटात जाहीर प्रवेश

0
70

बीड  प्रतिनिधी – बीड पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास आमटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटात समर्थकांसह जाहीर प्रवेश केला त्यामुळे खांडे पारगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या गटात जाहीर प्रवेश केल्यानंतर आता ग्रामीण भागातील कार्यकर्तेसुध्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कंटाळून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांच्या कळपात डेरेदाखल होऊ लागले आहेत. बीड पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास आमटे आणि खांडे पारगावचे उपसरपंच अनिलआमटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देऊन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटात जाहीर प्रवेश केल्याने खांडेपारगाव भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता खिंडार पडली आहे.
माजी उपसभापती विलास आमटे यांच्याबरोबरच पंचायत समितीचे माजी सभापती सखाराम ठोकळ, ह.भ.प.सदाशिव महाराज झनझने, संदिपान ठोकळ, नितीन आमटे, सुग्रीव आमटे, शिवाजी सपकाळ, गोवर्धन सपकाळ, हरीभाऊ आमटे, विठ्ठल ठोकळ, रमेश आमटे, रवी वाघमारे, विष्णू वाघमारे, मधूकर वाघमारे यांच्यासह चार ग्रा.पं. सदस्य आणि त्यांच्या समर्थकांचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here