Home Top News विजयी श्री घेऊन आ.संदीप क्षीरसागर नागपूरला रवाना

विजयी श्री घेऊन आ.संदीप क्षीरसागर नागपूरला रवाना

0
71

गणपती बाप्पाच्या आशिर्वादने नवगण राजुरीकरांने विजयाची गुढी उभी केली‌‌: दोन्ही तालुक्यात मिळुन नाबाद शतक ठोकणारा -आ संदीप क्षीरसागर

बीड-बीड आणि शिरूर का तालुक्यात 132 ग्रामपंचायत मध्ये निवडणुका पार पडले असून आज मतमोजणीच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत आघाडी व पॅनलची बुलेट ट्रेन च्या गतीने विजयाकडे घोडदौड सुरू असुन संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले नवगण राजुरी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आ संदीपने क्षीरसागरयांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या पॅनलने गणपती बाप्पा आशीर्वादाने विजयाची गुढी उभा केली असून प्रस्थापितांना भुई सपाट करून कात्रज चा घाट दाखविला असून राजुरी नवगण,उमरद जाहांगिर शहजानपुर ,कामखेडा पिंपरगवहाण, मुर्शिदपुर, लिंबा,लिंबारूई मु.या ग्रामपंचायतच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल आघाड्यांनी निर्विवाद बहुमत सिद्ध केले असून अखेरच्या फेरी पर्यंत मा खा शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आ संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली नाबाद शतक ठोकणार असुन दोन्ही तालुक्यात मतदार ग्रामस्थ माता भगिनी युवक आदीने कुठ्ल्याही अमिषाला आणि दबावाला बळी न पडता मतदानाच्या रूपाने भरभरून आशीर्वाद देऊन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे. त्याबद्दल सर्वांचे मनापासून शतशः आभार मानतो अशी प्रतिक्रिया आ संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here