Home Top News पाडळी येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांचे शिवसंग्राम भवन येथे स्वागत

पाडळी येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांचे शिवसंग्राम भवन येथे स्वागत

0
66

पाडळी येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांचे शिवसंग्राम भवन येथे जंगी स्वागत..

बीड : शिरुर तालुक्यातील पाडळी येथे सेवा सहकारी सोसायटीमध्ये जनशक्ती शेतकरी विकास पॅनलचे १३ पैकी १३ उमेदवार विजयी झाले. सेवा सहकारी सोसायटीच्या या विजयी उमेदवारांचा शिवसंग्राम भवन येथे जंगी स्वागत करण्यात आले
शिवसंग्राम,भाजप, शिवसेना या पक्षातील प्रतिष्ठित एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात शेतकरी विकास पॅनल व जनशक्ती शेतकरी विकास पॅनल अशी लढत सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत झाली होती. विद्यमान सरपंच यांच्या विरोधात १३ पैकी १३ उमेदवार निवडून आणून जनशक्ती शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय प्राप्त केला आहे.
अतिशय चुरशीच्या निवडणुकीत समाधान इंगळे, रामकृष्ण कंठाळे, किरण चव्हाण, भगवान पाखरे, भीमराव पाखरे, नवनाथ सानप, प्रभाकर हंगे, रामदास हंगे, संगीता कंठाळे, अश्रुबा धनगुडे, विठ्ठल सरवदे, बाबासाहेब आवंतकर या उमेदवारांनी विजय प्राप्त केला आहे. या निवडणुकीत  विजयी उमेदवारांसह शिवसंग्रामचे माऊली शिरसाट यांनी विशेष प्रयत्न केल्याने त्यांचाही येथोचित सत्कार यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष रामहरीभैया मेटे, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे,सुहास पाटील, शहराध्यक्ष अँड. राहुल मस्के, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे,पाडळीचे शिवसंग्राम नेते माऊली शिरसाट व अन्य शिवसंग्राम पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here