Home Top News महापुरुषांचे अवमान करणाऱ्या भाजप वाचाळांच्या निषेधार्थ बीड जिल्हा बंदला एआयएमआयएम पक्षाचा जाहीर...

महापुरुषांचे अवमान करणाऱ्या भाजप वाचाळांच्या निषेधार्थ बीड जिल्हा बंदला एआयएमआयएम पक्षाचा जाहीर पाठिंबा

0
73

यापुढे महापुरुषांची अवमानना करणाऱ्या वाचाळांना सहन करणार नाही – ॲड. शेख शफीक भाऊ

बीड प्रतिनिधी – एका मागोमाग एक भाजपचे वाचाळवीर महाराष्ट्रातील महापुरुषांचे अवमान करत सुटले आहेत. भाजपच्या या वाचाळांनी ओकलेल्या गरळच्या निषेधार्थ दिनांक १२ डिसेंबर २०२२ रोजी पुकारण्यात आलेल्या बीड जिल्हा बंदला एआयएमआयएम पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याचे तसेच यापुढे महापुरुषांची अवमानना करणाऱ्या वाचाळांना सहन करणार नाही असा खणखणीत इशारा एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सुर्या लाॅंस येथे सर्व पक्षीय व शिवप्रेंची बैठक संपन्न झाली होती, या मध्ये असे नमूद केले आहे की, राज्य आणि केंद्रात सत्ताधारी असल्याच्या तोऱ्यात भाजपचे वाचाळवीर महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विरोधात काही बाही बरळण्याची हिम्मत करत असून नेहमी एकता, समता, बंधुतेला अनुसरून मार्गक्रमण करणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करून जातीय विषमता पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु आता त्यांची ही नीती अन्य राजकीय पक्षांसह जनतेच्याही चांगलीच लक्षात आली आहे. त्यांच्या अशा प्रयत्नांना आता जनता भिक घालणार नाही. याचाच एक भाग म्हणून महापुरुषांविरोधात बरळणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी आणि राज्याचे शिक्षणमंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आदींसह इतरांविषयी अत्यंत आक्षेपार्ह विधाने करून राज्यामध्ये धर्माधर्मात अराजकता पसरविण्याचे षडयंत्र सुरू केले आहे. अशांची त्यांच्या पदावरून हकालपट्टी करण्यात यावी. तसेच महापुरुषांविरोधात काहीबाही बरळणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी. तसेच यापुढे महापुरुषांची अवमानना करणाऱ्या वाचाळांना सहन करणार नाही असा इशारा एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांनी पत्रकातून दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here